महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


केळी अन्नद्रव्य व व्यवस्थापन

केळी अन्नद्रव्य व व्यवस्थापन

नत्र नत्राच्या अभावामुळे झाडाची वाढ मंदावते, पाने फिक्कट हिरवी किंवा पिवळसर होतात आणि पानांची वाढ कमी होते, घडातील फळांची संख्या कमी होते-
स्फुरद स्फुरदच्या अभावामुळे केळीच्या पानावर निळसर -हजयाक दिसून येते- पानांच्या कडा करवतीच्या दांत्याच्या आकाराप्रमाणे करपतात-
पालाष केळीस सर्वात जास्त पालाष या अन्नद्रव्याची गरज असते- पालाषच्या कमतरतेमुळे -हजयाडास अकाली पिवळेपणा येतो, पानाचा आकार लहान होतो, केळफूल बाहेर पडण्यास जास्त विलंब लागतो- जर पालाषची कमतरता सुरूवातीपासूनच असेल तर घडाचे वजन 70 ते 75 टक्क्यांनी कमी येण्याची षक्यता टाळता येत नाही- पतात-
कॅल्षियम कॅल्षियमच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा करपतात, पान तलवारीसारखे तयार होते आणि मधील देठाभोवती पानाचा आकार वेडावाकडा तयार होतो - कॅल्षियमच्या कमतरतेमुळे केळीच्या सालीची लांबी वा-सजयत नाही आणि त्यामुळे केळी भरत नाही- तसेच केळी भरतांना वरील साल चिरलेली आ-सजयळते
मॅग्नेषियम मॅग्नेषियममुळे पिकाचा गडद आणि हिरवा रंग ठेवण्यास मदत होते- मॅग्नेषियमच्या कमतरतेमुळे पानाच्या मधल्या भागात मध्यषिरेजवळ पिवळेपणा दिसतो-
गंधक गंधकाच्या कमतरतेमुळे केळीची नवीन पाने पां-सजयरट पिवळी दिसतात- पानांच्या कडा पान पक्व होतांना पिवळट राहतात व पानांच्या षिरा जाडसर होतात-
लोह लोहाची कमतरता असतांना, हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या षिरांमधील भाग पिवळा पडतो आणि षिरा फक्त हिरव्या दिसतात- लोहाच्या कमतरतेची तीव्रता खूपच जास्त असेल तर पानांच्या या हिरव्या षिरा देखिल पिवळया पडतात आणि पाने पुर्णपणे पांढ दिसतात-
जस्त कजस्ताच्या कमतरतेमुळे पिकाची पाने लहान आणि अरूंद दिसतात- षेंडयाची वाढ मर्यादीत होवूेन त्याचे पर्णगुच्छात रूपांतर होते- नविन पानांची पाठीमागची बाजू जांभळट रंगाची दिसते-
बोराॅन बोराॅनच्या कमतरतेमुळे पानाचा आकार लहान होतो- पानांची गंुडाळी होणे किंवा पाने वेडीवाकळी होणे असेही दिसून येते-
मॅंगनीज मॅंगनीजच्या कमतरतेमुळे पानात हरिद्रव्याचा अभाव दिसतो- मुख्यआणि लहान षिरा गडद किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात त्यामुळे पानावर चैकटीदार नक्षी दिसू लागते-
तांबे तांब्याची कमतरता असल्यास ते पानावर नत्राच्या कमतरे प्रमाणेच लक्षणे दाखवितात आणि ते कोवळया पानांवर अधिक आळतात परंतू देठ तांबसर गुलाबी नसतात-

केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

      केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होणे अत्यंत गरजेचे आहे- सर्वसाधारणपणे] एक टन केळीच्या उत्पादनासाठी 6 ते 8 किलो नत्र, 1-5 ते 2 किलो स्फुरद, 17 ते 20 किलो पालाष, 1 ते 1-5 किलो गंधक, 3 ते 4-5 किलो कॅल्षियम आणि 2 ते 2-5 किलो मॅग्नेषियम जमीनीतून षोशून घेतले जाते- म्हणूनच रासायनिक खतांचा संतुलित वापर आजच्या आधुनिक शेतीसाठी अपरिहार्य आहे- रासायनिक खतांचा वापर करीत असतांनाच सेंद्रियय खतांचाही वापर करणे अनिवार्य आहे-

केळीसाठी सेंद्रीय खतांचा वापर

षेणखत केळीसाठी सेंद्रीय खत वापरणे हे उत्पादनाच्या दुष्टीने जितके महत्वाचे आहे तितकेच जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुपिकतेच्या दुष्टीनेही महत्वाचे आहे- केळीसाठी प्रतिझाड 10 किलो शेणखत लागवडीच्या वेळी वापरण्याची शिफारस करण्यात आलेली आहे-
केळीचे कंपोश्ट केळीची पिले पाने आणि घड कापल्यानंतर खोडाचा भाग शेताच्या कडेलाच खड्डा घेवून त्यात टाकावे- त ्यासोबत सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जीवाणू वापरावेत- यापासून चांगल्या प्रकारचे केळी कंपोश्ट खत तयार होते-
हिरवळीची खते हिरवळीचे पीक केळी लागवडीच्या अगोदर सलग पध्दतीने किंवा दोन ओळीमध्ये आंतरपिक म्हणून घेता येते- हिरवळीचे पीक घेण्याकरीता ती निवडतांना जलद वाढणारी] भरपूर सेंद्रिय पदार्थ तयार करणारी मुळांवर नत्र स्थिरीकरणाच्या गाठी असणारी कोणतीही व्दिदल वर्गीय पिके हिरवळीची पिके म्हणून घेता येतात- यामध्ये प्रामुख्याने ताग, धैचा, षेवरी, चवळी उडीद इ- व्दिदल पिकांचा समावेष होतो- चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी हिरवळीच्या पिकांची कापणी करून शेतात गाडावे-
निंबोळी पेंड केळीसाठी थंडीच्या दिवसांत प्रति झाड 0-5 ते 1 किलो निंबोळी पेंड वापरावी- तसेच युरीया खत देतांना ती निंबोळी पेडी बरोबर 6ः1 या प्रमाणात मिसळून द्यावीत-
गांडूळ खत केळी पिकासाठी प्रति झाड 5 किलो गांडूळखत वापरावे-