महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


केळीवरील किडींची लक्षणे व नियंत्रण
किडीचे नाव लक्षणे नियंत्रणाचे उपाय
सोंडकिड या किडीची अळी कंदात शिरणे कंद पोखरते त्यामुळे कंद पूर्णपणे कुजतो व ते झाड शेवटी पडते- शिफारस केल्याप्रमाणे कंद प्रक्रिया करावी- लागवडीनंतर प्रति झाड 20 ग्रॅ-फोरेट टाकावे पिकांची फेरपालट करावी- सापळा म्हणून खोडाचे साधारणतः 15 ते 30 सें-मी- लांबीचे उभे काप एकरी 10 ते 15 या प्रमाणात बागेत ठेवावे- सापळयाकडे आकर्शित झालेली किड गोळा करून नश्ट करावी-
खोडकिड झाडाच्या खोडावर छिद्रे पाडून खोड आतून पोखरते- प्रादुर्भावित खोड नंतर मोडून पडते- नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवावी- खोडवा घेणे टाळावी- फोरेट 20 ग्रॅ- प्रति झाड या प्रमाणात टाकावे- वरील प्रमाणे सापळा पध्दतीचा अवलंब करावा-
फुलकिडी केळी निसवते वेळी कमळात फुलकिडी अंडी घालतात- त्यातून फुलकिड निर्माण झाल्यानंतर अन्न घेण्यासाठी फळाची साल खरवडतात- त्यामुळे लालसर डाग दिसतात- व्हर्टीसिलीयम लेक्यानी या जैविक बुरषीची 30 ग्रॅ-प्रती 10 ली- पाण्यात घेवून घडावर फवारणी करावी- किंवा निंबोळी अर्क 500 मिली- 10 ली- पाण्यात घेवून फवारणी करावी- घड निसवतेवेळी अॅसिटॅमीप्रीड हे किटनाषक 10 लि- पाण्यात 1-25 ग्रॅम मिसळून फवारावे-
सुत्रकृमी सुत्रकृमी मुळामध्ये वास्तव्य करून मुळातील अन्नरसावर जगतात- त्यामुळे मुळे काळी पडून कुजतात- मुळावर गाठी निर्माण होतात- झाडाची वाढ खुंटते शिफारस केल्याप्रमाणे कंद प्रक्रिया करावी- लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड पावडर (500 ग्रॅम ते 1 किलो प्रति झाड) वापरावी- केळी बागेत झेंडू हे आंतरपिक घ्यावे-