महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


केळी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान

जमिनीची निवड.

केळी पिकाच्या वाणीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवष्यक आहे- तसेच जमीनीची खोली 60 सें-मी- पर्यंत असावी- जमिनीचा सामू हा 6-5 ते 8 दरम्यान असावा- क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये. केळी लागवड करण्यापूर्वी प्रयोगषाळेत मातीचे पृथक्करण करून घेणे महत्वाचे आहे- जमीनीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाष, गंधक, कॅल्षियम, मॅग्नेषियम आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे- जमीनीची सुपिकता टिकवण्यासाठी मातीचे परिक्षण करून आणि उत्पादनाचे व्यवहार्य लक्ष्य डोळयासमोर ठेवून शास्रीय पध्दतीने केळी पिकाच्या गरजेनुसार खतांचा वापर करणे अपरिहार्य आहे.

केळी लागवड हंगाम .

मृग बाग जून - जुलै लागवड

कांदे बाग ऑक्टोबर - नोव्हेंबर लागवड

केळी लागवडीचे अंतर

:-

चैरस पध्दत % 1-5 ग 1-5 मी हेक्टरी 4,444 झाडे

रासायनिक खते

केळीसाठी प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद व 200 ग्रॅम पालाष देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे- जमिनीतून रासायनिक खते देतांना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बंागडी पध्दतीने किंवा कोली घेवून खते द्यावी.

केळीसाठी जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक

अ-न
खत मात्रा देण्याची वेळ
युरिया
सुपर फॉस्फेट
म्युरेट ऑफ पोटॅष
ग्रॅम प्रति झाड
1 लावगडीनंतर 30 दिवसांचे आत 82 250 83
2 लावगडीनंतर 75 दिवसांनी 82 - -
3 लावगडीनंतर 120 दिवसांनी 82 - -
4 लावगडीनंतर 165 दिवसांनी 82 - 83
5 लावगडीनंतर 210 दिवसांनी 36 - -
6 लावगडीनंतर 255 दिवसांनी 36 - 83
7 लावगडीनंतर 300 दिवसांनी 36 - 83
एकूण 435 250 332