महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


केळी संशोधन केंद्र, जळगांव

पाणी व्यवस्थापन.

केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि-मी- पणी लागते- केळीसाठी ठिबंक सिंचन अत्यंत उपयुक्त असून,ठिबंक सिंचनासाठी ड्रिपर किंवा इनलाईन ड्रिपर चा वापर करणे अधिक योग्य असते- बाश्पीभवनाचा वेग, जमीनीची प्रतवारी, वाढ अवस्था इ- बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास केळी पिकाची पाणी वापर क्षमता आणि पाणी उत्पादकता वाढयासाठी मध्यम खोल काळया जमिनीत केळी लागवडीनंतर 1 ते 5 महिन्यांपर्यत 60 टक्के बाश्पपर्णाेत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढ पाणी, 6 ते 8 महिन्यांपर्यत 70 टक्के बाश्पपर्णाेत्सर्जाची पूर्तता करण्याएवढ पाणी आणि 9 ते 12 महिन्यापर्यंत 80 टक्के बाश्पपर्णाेत्सर्जाची पूर्तता करण्याएवढ पाणी ठिबंक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आली आहे


केळीसाठी पाण्याची गरज लि प्रति झाड प्रति दिवस

मृगबाग केळी
कांदेबाग केळी
महिना
पाण्याची गरज
महिना
पाण्याची गरज
जून 06 आॅक्टोबर 04-06
जुलै 05 जुलै 04
आॅगस्ट 06 डिसेंबर 06
सप्टेंबर 08 जानेवारी 08-10
आॅक्टोबर 10-12 फेब्रुवारी 10-12
नोव्हेंबर 10 मार्च 16&18
डिसेंबर 10 एप्रिल 18&20
जानेवारी 10 मे 22
फेब्रुवारी 12 जून 12
मार्च 16&18 जुलै 14
एप्रिल 20&22 आॅगस्ट 14&16
मे 25&28 सप्टेंबर 14&16