महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


केळीवरील रोगांची लक्षणे व नियंत्रण
रोगाचे नाव
लक्षणे
नियंत्रणाचे उपाय
करपा किंवा पिवळा सिगाटोका हा बुरशीजन्य रोग असून यात सुरूवातीला पानांवर पिवळया रंगाचे लहान लहान ठिपके दिसून येतात- कालांतराने हे ठिपके मोठे होऊन आतील भाग करडया रंगाचा होतो व ठिपक्याभोवती पिवळया रंगाचे वलय दिसून येते- रोगाची तीव्रता वाढयास पाने करपतात- रोगग्रस्त पानाचा भाग / पाने काढून जाळावीत- झाडावर 10 ग्रॅ- कार्बेन्डॅझिम किंवा 10 मिली प्राॅपीकोनॅझोल किंवा 10 मिली ट्रायडेमार्क अधिक चांगल्या प्रतीचे स्टीकर 10 ली- पाण्यात मिसळून फवारावे- पाण्याच्या निचÚयाकडे लक्ष द्यावे- तसेच बाग नेहमी स्वच्छ ठेवावी-
काळी बोंडी किंवा सिगार एन्ड राॅट या बुरशीजन्य रोगास जळका चिरूट असेही म्हणतात- यात फळांची टोके काळी पडतात व कुजतात- त्यामुळे अर्धवट पेटवलेल्या चिरूट प्रमाणे रोगट केळी दिसतात- घड निसवल्यावर घडावर 10 ग्रॅम कार्बेडॅझिम किंवा 25 ग्रॅम डायथेन एम - 45 अधिक चांगल्या प्रतीचे स्टीकर 10 ली-पाण्यात मिसळून फवारावे-
इर्विनिया राॅट किंवा हेडराॅट हा जीवाणूजन्य रोग असून लागवडीनंतर 2 ते 3 महिन्याच्या अवस्थेपर्यंत दिसून येतो- यात केळीचा पोंगा कुजतो- तसेच जमिनी लगत बुंधा कुजतो- रोगाची लक्षणे दिवताच 100 ली-पाण्यात 300 ग्रॅ-काॅपर आॅक्सिक्लोराईड ़ 15 ग्रॅ-स्ट्रेप्टोसायक्लीन ़ 300 मि-ली क्लोरपायरीफाॅस मिसळून द्रावण तयार करू न प्रत्येक झाडास 200 मि-ली द्रावण टाकावे (आळवणी करावी)-
पर्णगुच्छ किंवा बंची टाॅप हा विशाणूजन्य रोग असून झाडाची वाढ खुंटते] पानांचा आकार लहान राहून पाने एकाच ठिकाणी एकवटून गुच्छ तयार होतो- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाड उपटुन नश्ट करावे- कंदामार्फत विशाणूजन्य रोगांचा प्रसार होत असल्याने षिफारस केल्याप्रमाणे कंद निवड व प्रकिया करावी- केळी पिकात किंवा बागेभोवती काकडी वर्गीय] वांगेवर्गीय पिके घेऊ नयेत- विशाणू निर्देषांक तपासलेल्या ऊति संवर्धित रोपांचा तपासलेल्या ऊति संवर्धित रोपांचा वापर करावा-
पोगासड किंवा इन्फेक्षियस क्लोराॅसिस हा विशाणूजन्य रोग असून यात पोगा सडतो] पानांवर पिवळे चट्टे दिसतात- पानांचा आकार तलवारी सारखा होतो-