महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


केळी घडाची गुणवत्ता वाढविणे

घड पुर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे. घडावर 8 ते 9 फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीने सुरवातीलाच कापुन टाकाव्यात. केळीचा घड पुर्ण निसवल्यावर व केळफूल तोडल्यावर त्यावर 10 ली. पाण्यात 50 ग्रॅम पोटॅषियम डायहायड्रोजन फाॅस्फेट अधिक 100 ग्रॅम युरिया अधिक स्टीकर (10 मिली) मिसळून फवारणी केल्याने लांबी आणि घेर वाढून केळीच्या वजनातही वाढ होते केळीचे घड 0.5 मि.मी. जाडीच्या 75 ग 100 सें.मी. आकाराच्या 6 टक्के सच्छिद्र प्लास्टिक पिशव्या झाकावेत.

केळी घडाची गुणवत्ता वाढविण्याचे उपाय

उच्चतम प्रतीची निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे घड व्यवस्थापन करावे

केळफुल कापणे

केळीची निसवण होवून सर्व फण्या केळकमळातून बाहेर पडतात. शेवटची फणी बाहेर आल्यानंतर 2 ते 3 दिवसांत खालील उमलणारे केळफुल धारदार विळयाच्या सहाय्याने कापून घ्यावे. केळफुल वेळीच कापल्याने त्यास अनावष्यक होणारा अन्नपुरवठा हा वाढणा-या घडास मिळतो व घडाच्या उत्तम वाढीस मदत होते. त्याचप्रमाणे केळफुलात लपणा-या रेड रस्ट थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. ही कापलेली केळफुले बागेमध्ये इतस्ततः न टाकता गुरांना खाद्य म्हणून किंवा कंपोस्ट खड्डयात टाकावीत-

फण्यांची विरळणी करणे

फळांच्या आकारमानात सकारात्मक बदल होवून घड लवकर परिपक्व व्हावा, यासाठी फण्यांची वेळीच विरळणी करणे आवश्यक आहे. केळीच्या प्रमुख व्यापारी वाणांमध्ये 9 पेक्षा जास्त फण्या येतात व सर्व फळांना योग्य पोशण न मिळाल्याने त्यातील फळांचे आकारमान एकसारखे राहत नाही. परिणामी मालाचा दर्जा ढासळतो. निर्यात योग्य चांगल्या दर्जाची केळी मिळण्यासाठी घडावर 6 ते 8 फण्या ठेवून खालील बाजूच्या अतिरीक्त फण्या धारदार विळयाच्या सहाय्याने व्यवस्थीतपणे कापून टाकाव्यात. यामुळे झाडावरील घडाला व्यवस्थित अन्नरसाचा पुरवठा होवून फळांचे आकारमानात सकारात्मक बदल घडून येतो.

संजीवकांचा वापर

केळी संशोधन केंद्र, जळगांव येथे घेण्यात आलेल्या विविध प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे की, केळीचा घड पुर्ण निसवल्यानंतर घडावर पोटॅषियम डाय हायड्रोजन फाॅस्फेट 0.5 टक्के (5 ग्रॅम प्रति लिटर पाणी) अधिक युरिया 1 टक्का (10 ग्रॅम प्रति लिटर पाणी) यांच्या एकत्रित द्रावणाची फवारणी केली असता फळांची लांबी आणि घेर वाढल्याने केळीच्या वजनातही वाढ होते. संजीवकांची फवारणी ही केळफुल कापल्यानंतर व फण्यांची विरळणी केल्यानंतर ताबडतोब करावी.

किटकनाषकांची फवारणी

रेड रस्ट थ्रिप्स ही केळी पिकावरील प्रमुख किड असून या किडीची प्रौढ व बाल्यावस्था अपरीपक्व फळांची साल खरडून त्यातून येणारा अन्नद्रव्य पोषण करतात. या अन्नरसावरच त्यांची उपजिवीका चालते. अषा खरवडलेल्या पेषी मरतात. केळी परिपक्व होतांना त्या ठिकाणी तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे तयार होतात तसेच त्या ठिकाणी सालीला बारीक तडे पडतात. गुणवत्ता खालावल्यामुळे अषा फळांना बाजारभाव मिळत नाही. निर्यातीस अषी फळे अयोग्य ठरतात. फुलकिडींचा प्रादुर्भाव केळी निसवल्यावर दिसून येतो. या किडीचे नियंत्रणासाठी केळफुल बाहेर पडतेवेळी किंवा शेवटचे पान बाहेर पडताच अॅसिटॅमिप्रीड 20 एस.पी. 1.25 ग्रॅम प्रति दहा लिटार पाण्यात किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 0.03 टक्के प्रवाही (19 मिली ़ 10 लिटर पाणी) स्टिकरसह फवारणी करावी. तदनंतर 7 दिवसांनी घडावर व पानांच्या बेचक्यात वरीलप्रमाणेच फवारणी करावी. सेंद्रीय फवारणीसाठी 30 ग्रॅम व्हर्टिसीलीयम लेकॅनी किंवा 5 टक्के निंबोळी अर्क ़ स्टीकरची फवारणी करावी

दांडयासहीत घड झाकणे

केळफुल कापणे , फण्यांची विरणी, किटकनाषके व संजीवकांची फवारणी असे सर्व संस्कार झाल्यानंतर हा घड 0.5 मि. मि./100 गेज जाडीच्या 45 ग् 100 सेमी. आकाराच्या, पांढ-या 2 टक्के सच्छिद्रता असलेल्या प्लास्टीक पिशव्यांनी झाकावा. पिषवी बांधतांना दांडयाचा अधिकाधिक भाग बांधण्याचा प्रयत्न करावा. पिशवीचे खालील तोंड मोकळे सोडावे. घडावर प्लास्टीक पिशवी बांधल्याने घडावर उन, वारा, पाउस, फुलकिउी, थंडी, धुळ यापासून सरंक्षण होते. घडाभोवती पोशक सुक्ष्म वातावरण निर्माण होवून घडांच्या वाढीस मदत होते. घडाची जोमाने वाढ होते व घड लवकर पक्व होतो. घडाचा दांडाही झाकल्याने तीव्र सुर्यप्रकाषापासून संरक्षण होवून घड तुटणे तसेच घड सटकण्याच्या विकृतीस अटकाव होतो.

पाने कापणे

घड वाढीच्या अवस्थेत घडांना घासून फळांना विकृत करणारी तसेच रोगट पाने वेळीच कापून बागेबाहेर नेवून नष्ट करावीत.

झाडांना आधार देणे

वरील सर्व सोपस्कार झाल्यानंतर घडाची झपाटयाने वाढ होवून आकारमानात व वजनात सुधारणा होते. झाडाच्या कक्षाबाहेर लोंबणा-या या वजनदार घडामुळे अनेकवेळा झाड वाकते व वारा आल्यास काहीवेळा मोडते किंवा उन्मळुन पडते. घडाच्या वाढीच्या अवस्थेत झाड मोडू किंवा पडू नये म्हणून झाडांना आधार देणे आवश्यक आहे. यासाठी केळीची खोल लागवड करावी, खोडाला वेळोवेळी मातीची भर लावावी तसेच काठया किंवा पाॅलीप्राॅपीलीन पट्टया वा नायलाॅन दो-यांच्या सहायाने निसवलेल्या झाडांना आधार द्यावा.

7- पहिल्या प्रकारामध्ये दोन बांबुची कैची, षेवरी, निलगीरी किंवा इतर झाडांच्या फांद्या तोडून ल् (इंग्रजी वाय) आकाराच्या काठयांच्या सहायाने झाडाच्या गळयालगत आधार देता येतो. मात्र अनेकवेळा घड या आधारावर रेलतो व या काठयांच्या घर्शनाने फळांची साल खराब होते. दुस-या प्रकारामध्ये पॅकींगसाठी वापरण्यात येणा-या अर्धा इंच जाडीच्या पाॅलीपाॅपीलीन पट्टयांचा वापर केला जातो. ज्या झाडाला आधार द्यायचा आहे. त्या झाडाच्या गळयाभोवती पट्टीचे एक टोक बांधले जाते. पट्टीचे दुसरे टोक त्या झाडाच्या विरूध्द दिशेला असलेल्या समोरील झाडाच्या बंुध्यालगत बांधण्यात येते. झाडांना आधार देण्याची ही प्रभावी व स्वस्त आणि सुलभ पध्दत आहे. पाॅलीप्राॅपीलीन पट्टयाप्रमाणेच दो-यांचाही याकामी वापर करता येतो.

घडांची काढणी

घड व्यवस्थापनामध्ये घडांच्या योग्य पक्वतेला कापणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. निर्यातीकरीता तसेच दूरच्या बाजारपेठेसाठी 75 ते 80 टक्के आणि जवळच्या बाजारपेठांसाठी 85 ते 90 टक्के पक्वतेस घडांची काढणी करावी. योग्य पक्वतेस धारदार विळयाच्या सहाय्याने सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी 15 ते 20 से.मी. लांबीच्या दांडा ठेवून कापणी करावी. घड कापतांना तसेच इच्छित स्थळी त्याची वाहतुक करतांना त्याची कमीत कमी हाताळणी होईल तसेच कोणत्याही प्रकारची जखम वा इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

9- केळी घडाची योग्य जोपासना व्हावी, यासाठी केळी लागवडीपासूनच काळजी घेणे आवश्यक असून पिकाची व्यवस्थित आंतरमषागतय् अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन याची योग्य अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरते.