महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


संशोधनाच्या शिफारसी ठळक वैशिष्ट्ये

मुनव्यांची निवड

केळीच्या चांगल्या उत्पादनाकरीता केळी लागवडीसाठी केळीचे मुनवे (कंद) साधारणतः 450 ते 750 ग्रॅम वजनाचे उभट किंवा नारळाच्या आकाराचे निवडावे.

लागवडीसाठी कालावधी

केळीच्या अधिक उत्पादनासाठी जुन मधील पाऊस सुरू होण्यापुर्वी केळीचा मृगबाग (जुन लागवड) लागवड अधिक फायदेषीर दिसुन आली आहे-तसेच कांदे बाग आॅक्टोंबर लागवड ही अधिक फायदेषीर दिसुन आली आहे.

केळीमधील आंतरपिक पध्दती

केळीच्या मृगबागेमध्ये भुईमुगाचे (फुले प्रगती) आंतरपिक घेतले असता केळीच्या उत्पादनावर विपरीत परीणाम न होता आर्थिकदृष्टया फायदा झाल्याचे दिसून आले आहे

केळीसाठी आच्छादन व बाष्परोधाकाचा वापर

केळीच्या बागेत प्रती झाडास 12.5 किलो गव्हाच्या भुषाचे आच्छादन केले असता जमिनीतील ओलावा टिकण्यास तसेच घडाचे वजन वाढल्याचे दिसून आले आहे. केओलीन या बाश्परोधक रसायनाचा 8: तिव्रतेची फवारणी केळीच्या पानावर केल्यास पाण्याची बचत होवून उत्पादनात 15: वाढ झाल्याचे दिसून आले.

फण्याची विरळणी

केळी फळाचे निर्यात योग्य निकश पुर्ण करण्यासाठी घडात 7 ते 8 फण्या ठेवून खालच्या फण्यांची विरळणी करावी.

केळी पिकावर संप्रेरक आणि रसायनांचा परीणाम

केळीचा घड पुर्ण निसवल्यानंतर त्यावर पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट (0.5:) किंवा 2-4 डी चे 10 पीपीएमचे द्रावण फवारले असता केळीचा आकार वाढून घडाच्या वजनात आणि प्रतीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

घड अच्छादनाचा केळीच्या उत्पादनावर व पक्वतेवरील परीणाम

हिवाळयात केळीचे घड पांढरया सछिद्र (2:) पिशव्यांनी झाकले असता तसेच प्रत्येक झाडास एक किलो निंबोळी पेंड दिल्यास घड लवकर तयार होतो व झाडांचे थंडीपासून संरक्षण झाल्याचे दिसून आले आहे.

केळीवरील जळका चिरूट रोगाचे नियंत्रण

केळीवरील जळका चिरूट या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी डायथेन एम 45 (0.5:) तसेच कोरडया केळीच्या पानाचे आच्छादन केळीच्या घडावर केले असता केळीवरील जळका चिरूट रोगाचे नियंत्रण 33.45: ते 15.82: ने कमी झाल्याचे दिसून आले आहे.

1997

लागवडीपुर्वी मुनव्यावर प्रक्रिया आणि आंतरपिके याव्दारे केळी पिकातील सुत्रकृमीचे नियंत्रण

 

केळीचे मुनवे तासून मोनोक्रोटोफाॅस (0.5:) द्रावणात एक तास बुडवून लागवड करून त्यात झेंडू किंवा तागाचे आंतरपिक घेतल्यास मातीच्या तसेच मुळयांच्या नमुन्यात असणारया सुत्रकृमींचे चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचे दिसून आले आहे.

केळीचे मुनवे प्रादुर्भावरहित करणे

केळीचे मुनवे चांगले खोलवर तासुन घेऊन प्रती मुनव्यास 40 ग्रॅम कार्बोफयुराॅनची प्रक्रिया केल्यास जमिनीतील तसेच मुळांमधील सुत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी दिसून आला आणि उत्पादनही वाढल्याचे दिसून आले. तसेच केळीचे मुनवे खोलवर तासून मोनोक्रोटोफाॅस (0.75 ः) द्रावणात एक 45 मिनीटे बुडवून सुदधा लागवड केल्यास सुत्रकृमींचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे नियंत्रीत करता येतो व उत्पादनही वाढल्याचे दिसून आले आहे.

1999

लागवडीचे अंतर

बसराई आणि ग्रॅन्ड नैन हया केळीच्या वाणाची लागवड ठिबक सिंचनाखाली 1.2 ग 1.5 मी. किंवा जोड ओळ पदधतीत 1.0 ग 1.2 ग 2.1 मी. अंतरावर केली असता अधिकत्तम उत्पादन मिळते.

तण नियंत्रण

केळी पिक सतत तणमुक्त ठेवावे. आंतरमशागत तसेच निंदणी व दोनवेळा सलग चवळीचे आंतरपिक घेतल्यास केळी पिकातील तणनियंत्रण चांगले होते.

2001

केळी पिकासाठी घ्यावयाच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय खतांचे प्रमाण ठरविणे

केळीच्या ग्रॅन्ड नैन जातीपासून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी द्यावयाच्या एकूण नत्रापैकी 25: सेंद्रिय खतातून आणि 75: असेंद्रिय खतातून द्यावे.

2004

लागवडीसाठी वाण

अधिकत्तम उत्पन्नासाठी अन्नद्रव्यांच्या उच्च पातळीच्या स्थरात श्रीमंती या वाणाची शिफारस करण्यात येत आहे.

2006 एकात्मिक खत व्यवस्थापन

ग्रॅन्ड नैन केळीच्या अधिकत्तम उत्पन्नासाठी प्रती झाड 10 किलो षेणखत व 200ः40ः200 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाषची शिफारस करण्यात येत आहे. यासोबत प्रति झाड 25 ग्रॅम प्रत्येकी अॅझोस्पिरीलम व पीएसबी द्यावे. एकूण 200 ग्रॅम नत्रयुक्त खतापैकी 75: नत्र एकूण 4 हप्त्यात शारीरिक वाढीच्या काळात (लागवडीनंतर 30, 75, 120 व 165 नंतर द्यावा) तर उरलेला 75: नत्र तीन हप्त्यात (लागवडीनंतर 210, 255 व 300 दिवसांनी द्यावा). पुर्ण स्फुरदयुक्त खताची मात्रा लागवडीचे वेळी द्यावी तर पालाषची मात्रा चार समान भागात विभागून लागवडीवेळी, लागवडीनंतर, 165, 255 व 300 दिवसांनी द्यावयाची शिफारस करण्यात येत आहे.

2007 फुलकिडी पासून नियंत्रण

केळी घड निघण्यापुर्वी आणि घड निसवल्यानंतर घडावर 0.05: मोनोक्रोटोफाॅसची फवारणी केली असता केळी घडाचे फुलकिडी पासून चांगले नियंत्रण होते. रेड रस्ट थ्रिप्सच्या प्रभावी नियंत्रणासाठी 0.025: अॅसिटामिप्रीडच्या दोन फवारण्या (घड निसवण्याचे वेळी व दुसरी प्रथम फवारणीनंतर 7 दिवसांनी) करावी. तसेच जैविक नियंत्रणासाठी 5: निंबोळीअर्क किवा फुले बग्गीसाईड (3 ग्रॅम प्रति लिटर) फवारणीची शिफारस करण्यात येत आहे.

केळीवरील करपा रोग नियंत्रण

केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणाकरीता व केळीचे अधिक उत्पादनाकरीता कार्बेन्डॅझिम 0.1 ः द्रावणाची बेणे प्रक्रिया करावी तसेच केळी बागेमध्ये या रोगाची लक्षणे दिसताच प्राॅपीकोनॅझोल 0.5: बुरषीनाषकाच्या द्रावणात चांगल्या प्रतीचे चिकट द्रव्य मिसळून 30 दिवसाच्या अंतराने संपुर्ण झाडावर फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

2008 केळीसाठी ठिबक सिंचनातून खतांचा वापर

केळीच्या अधिक उत्पादनासाठी, मध्यम काळया जमिनीत, नत्र व पालाषयुक्त खतांच्या शिफारसीत मात्रेच्या 75टक्के मात्रा (150 ग्रॅम नत्र व 150 ग्रॅम पालाष प्रति झाड) ठिबक सिंचनातून देताना, 1 ते 16 व्या आठवडयांपर्यत 3 ग्रॅम नत्र व 2 ग्रॅम पालाष प्रति झाड प्रती आठवडा, 17 ते 28 आठवडयांपर्यत 6 ग्रॅम नत्र व 5 ग्रॅम पालाष प्रति झाड प्रती आठवडा, 29 ते 40 आठवडयांपर्यत 2.5 ग्रॅम नत्र व 4 ग्रॅम पालाष प्रति झाड प्रती आठवडा तर 41 ते 44 आठवडयांपर्यत 3 ग्रॅम पालाष प्रति झाड प्रती आठवडा वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. तसेच स्फुरदाची 40 ग्रॅम प्रति झाड ही शिफारसीत मात्रा व 10 किलो षेणखत प्रति झाड केळी लागवडीच्या वेळेसच जमिनीतून दयावे.